भाजपला शिंदे सरकारचं ओझं झालंय; संजय राऊतांचा टोला

भाजपला शिंदे सरकारचं ओझं झालंय; संजय राऊतांचा टोला

नवी दिल्ली | New Delhi

ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे. भाजपाला एकनाथ शिंदे सरकारचं (Shinde-Fadnavis Government) ओझं झालं आहे असं वक्तव्य आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

भाजपला शिंदे सरकारचं ओझं झालंय; संजय राऊतांचा टोला
मुळाकाठ परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

एवढंच नाही तर शिवसेनेने आम्हाला सर्वोच्च पदावर बसवलं आहे. शिवसेना नसती तर आम्ही कुठे असतो? हा प्रश्न मी कायमच विचारतो. उद्धव ठाकरेंनी जे जोडे पुसण्याचं वक्तव्य केलं ते योग्यच आहे. दरम्यान संजय राऊत बोलले की, “एक नक्कीच आहे की महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला सध्याच्या सरकारचं ओझं झालं आहे. हे ओझं किती काळ खांद्यावर घेऊन फिरायचं हा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा मी ऐकतो आहे. अर्थात तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपला शिंदे सरकारचं ओझं झालंय; संजय राऊतांचा टोला
मुळाकाठ परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बारसू रिफायनरी (Barsu Refinery Project) प्रकल्पासंदर्भात सुरु असलेल्या आंदोलनानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. स्थानिक लोकांशी चर्चा करा. त्यांना विश्वासात घ्या, असं शरद पवार म्हणाले आहेत. म्हणजे काय करायचं? स्थानिकांचा या सरकारवर विश्वासच नाही.

सत्ताधारी उद्धव ठाकरे यांचं पत्र दाखवत होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावर स्पष्टपणे सांगितलं आहे. केंद्राकडून वारंवार पर्यायी जागेची मागणी होत होती. म्हणून उद्धव ठाकरे यांनी पर्यायी जागा सूचवली. पण अडिच वर्ष सत्तेत असताना ही जागा मिळावी म्हणून जोर जबरदस्ती केली नाही. लोकांना नको असेल तर बारसूही नको ही आमची भूमिका होती, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपला शिंदे सरकारचं ओझं झालंय; संजय राऊतांचा टोला
Rain Alert : बळीराजा चिंतातूर! पुन्हा थैमान घालणार अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टिकेच समर्थन करत टोला लगावला आहे, यावेळी ते म्हणाले की, मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना विषारी साप म्हटल्याचं मी ऐकलं. पण ते नेमकं काय म्हटले हे मला माहित नाही. मात्र समजा साप म्हटलं असेल तर गैर काय? कारण महाराष्ट्रात सापाची, नागाची पूजा केली जाते. सापाला देव मानलं जातं. साप हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंचं समर्थन करत संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com