केंद्राकडून राज्याच्या आर्थिक कोंडीचा प्रयत्न; संजय राऊतांचा हल्लाबोल

केंद्राकडून राज्याच्या आर्थिक कोंडीचा प्रयत्न; संजय राऊतांचा हल्लाबोल

औरंगाबाद | Aurangabad

देशात महागाई (Inflation) ही राष्ट्रीय समस्या बनली आहे. पेट्रोल (Petrol) अजूनही शंभरी पार आहे. केंद्राकडून राज्याच्या आर्थिक कोंडीचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला...

वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेच्या आक्रोश (Shivsena Morcha) मोर्चाला औरंगाबादमध्ये खासदार राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. असंख्य शिवसेना कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा क्रांती चौकातून गुलमंडीकडे निघाला आहे.

राऊत पुढे म्हणाले की, वाढत्या महागाईविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षाची करण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्राची आर्थिक धोरण चुकीची आहेत. महागाई विरोधात हा देशातील पहिला मोर्चा असून मराठवाड्यात फक्त या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. आता हे लोण संपूर्ण देशभर पसरणार आहे. मराठवाड्याने राज्याला लढण्याची प्रेरणा दिलीअसल्याचे राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com