संजय राऊतांचे मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, औरंगाबादचं नामांतर...

संजय राऊतांचे मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, औरंगाबादचं नामांतर...

मुंबई | Mumbai

उस्मानाबाद (Osmanabad) शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने 'ना हरकत पत्र' दिले असून औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे...

यावेळी ते म्हणाले की, औरंगाबाद (Aurangabad) शहराचे संभाजीनगर (Sambhaji Nagar) तसेच उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंजुरी दिली होती. मात्र आता केंद्र सरकार पुढील प्रक्रिया का करत नाही, असे म्हणत केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असूनही हा निर्णय घेण्याची हिंमत का होत नाही? कोणता नियम आणि कायदा आड येत आहे, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

संजय राऊतांचे मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, औरंगाबादचं नामांतर...
Video : ...अखेर 30 तासांच्या प्रतीक्षेनंतर बछडे मादीच्या कुशीत

तसेच पुढे बोलताना त्यांनी आसाम सरकारच्या (Government of Assam) जाहिरातीवरूनही टीका केली. ते म्हणाले, 'आसामचे मुख्यमंत्री अशी जाहीरात देत असतील तर आपले सरकार या करत आहे? राज्याचे मुख्यमंत्री खोके घेऊन आसाममध्ये पाहुणे बनून गेले होते. त्याबदल्यात आसामला ज्योतिर्लिंग दिले का? हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे राऊत यांनी म्हटले.

संजय राऊतांचे मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, औरंगाबादचं नामांतर...
Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाचा आज तिसरा दिवस; निकालाकडे राज्याचे लक्ष
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com