Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराऊतांचा राहुल शेवाळेंवर हल्लाबोल; म्हणाले, ज्याच्यावर...

राऊतांचा राहुल शेवाळेंवर हल्लाबोल; म्हणाले, ज्याच्यावर…

मुंबई | Mumbai

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून (Sushant Singh Rajput case) काल शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी काल संसदेत बोलतांना रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू (AU) नावाने ४४ कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांनी सांगितल्याचे म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी हे आरोप फेटाळून लावले होते. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शेवाळे यांच्यावर टीका केली आहे…

- Advertisement -

ते म्हणाले की, आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) जे आरोप केले आहे, त्याला शुद्ध मराठी भाषेत हलकटपणा आणि नीचपणा म्हणतात. ज्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे, ते आरोप करत आहेत. शेवाळे हा किरकोळ माणूस आहे, जो सदस्य सदनात नसतो त्याचं नाव घेता येत नाही,असा लोकसभेचा (Loksabha) नियम आहे. हे ठरवून चालले आहे. तसेच अशा कितीही फाइल निघतील. तुमच्या घरातल्या सुद्धा फायली निघू शकतात. फाईलींची लढाई सुरू झाली तर जड जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला..

पुढे ते म्हणाले की, अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) भ्रष्टाचार आणि भूखंड घोटाळ्याचे आरोप होत आहे. त्याला उत्तर देताना यांची पळापळ होत आहे. या आरोपांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी आरोप केले जात असेल तरे भ्रमात आहे. हे सरकार भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आले. भ्रष्टाचाराच्या ओझ्यानेच हे सरकार पडणार आहे. अशा प्रकारचे किती आरोप केले. माझ्यावर खोटे आरोप केले. मला जेलमध्ये टाकले. शिवसैनिक संपणार नाही, मागे हटणार नाही. जे आरोप करत आहे. त्यांचे सरकार हे औटघटकेचे असणार आहे, असेही राऊतांनी सांगितले

- Advertisment -

ताज्या बातम्या