Wednesday, April 24, 2024
HomeजळगावVideo # बंडाळीला संजय राऊत कारणीभूत !

Video # बंडाळीला संजय राऊत कारणीभूत !

पाचोरा Pachora (प्रतिनिधी) –

आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) हे तब्बल पंधरा दिवसानंतर आणि राज्यात भाजपा-शिंदेशाही सरकार स्थापन (BJP-Shindeshahi government formed) झाल्या नंतर मतदार संघात परतले (Returned to the constituency) आहे. शहरात त्यांचे स्वागतही झाले. त्यांना भेटण्यासाठी मतदारसंघातील सेनेचे पदाधिकारी व पाचोरा शहरातील समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानातील शिवालय कार्यालयात एकच गर्दी केली होती. यावेळी आ.किशोर पाटील यांनी सर्वांशी संवाद साधताना (While communicating) एकनाथराव शिंदे यांच्या बंडाळीत (rebellion of Eknathrao Shinde) आणि गटात सुमारे पन्नास आमदार का भाजपा सोबत (MLA with BJP) का गेलो .?कश्यासाठी गेलो ? याचा खुलासा (Revealed) केला.

- Advertisement -

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, बंडू चौधरी, शहरप्रमुख किशोर बारावकर, चंद्रकांत धनवडे, डॉ. प्रमोद पाटील, राजेंद्र जिभु पाटील, गणेश पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील सह माजी नगरसेवक, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाशी गद्दारी नव्हे तर हक्कासाठी उठाव

यावेळी आ.किशोर पाटील यांनी सर्वांशी संवाद साधताना एकनाथराव शिंदे यांच्या बंडाळीत आणि गटात सुमारे पन्नास आमदार का भाजपा सोबत का गेलो .?कश्यासाठी गेलो ? याचा खुलासा केला.आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारधारेचे आणि आमचे नेते एकनाथराव शिंदे यांचे शिष्य असून आम्ही आजही शिवसेनेचेच आणि शिवसेनेतच आहोत. आम्ही पक्षाशी कोणतीही गद्दारी केली नसून शिवसेना वाचविण्यासाठी न्यायहक्कासाठी केलेले हे बंड नव्हे तर उठाव असल्याचे संगितले.

शिवसेना वाचवण्यासाठी ना.शिंदे यांचा उठाव

त्या नंतर प्रसार माध्यमांशी सवांद साधत असतांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना म्हणाले कि,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांनी 22वर्षाच्या राजकारणात आम्हाला भरपूर दिले सेने मुळेच आम्ही मोठे झालो याचं मी आभार मानले आहे. मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांनी किंवा आम्ही आठ मंत्री मिळून पन्नास आमदारांनी कोणत्याही स्वार्थासाठी बंड केले नसून शिवसेना वाचवण्यासाठी हे सर्व काही करावे लागले.

बंड करण्याची अनेक कारणे देखील आहेत. पंचवीस वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांसोबत ज्या शिवसेनेने आणि आम्ही राजकिय संघर्ष करून शिवसेना उभी केली त्या पक्षांसोबत मांडीलामांडी कसे काय बसावे ! पण पक्ष नेतृत्वाखाली नाईलाजाने सत्तेत बसावे लागले. मतदार संघातील विकासासाठी आणि भविष्यातील राजकारणाच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातच उद्धवजी ठाकरे सेनेचे मंत्री- आमदारांना वेळ देत नव्हते. शिवसेना पक्ष राज्यात चार नंबरवर फेकला गेला हे दिसत होते !

हे सर्व काही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वारंवार सांगूनही उपयोग होत नव्हता. अश्या अनेक कारणांमुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे नाराजी वाढल्याने शिवसेनेत ही बंडाळी झाली आहे. एकनाथराव शिंदे साहेब आणि माझे अत्यंत जवळचे जवळचे संबंध असल्याचे सर्वांना माहीत आहे. त्यांनी माझ्या सुख-दुःखात आणि मतदार संघाच्या विकासासाठी मला साथ दिली आहे. मी त्यांचा शिष्य आहे. मी कोणत्याही अमिषापोटी किंवा मंत्रीपदांच्या लालसेने गद्दारी केलेली नाही.

पन्नास कोटींचे आरोप निरर्थक

बंडखोर आमदारांना पन्नास कोटी मिळाले हे विरोधकांचे आरोप निरर्थक आहेत. मी फक्त एकनाथराव शिंदे यांचे आदेश पाळले आहे. माझे काम पाहून जर मला मंत्रिपद मिळत असेल तर स्वीकारेल परंतु स्वतः मागणार नाही हे देखील आमदारांनी सांगितले.

संभ्रम आणि नाराजी दूर करणार

बडखोरीच्या भूमिके नंतर आणि सत्तांतरा नंतर आमच्या पुढे अनेक राजकीय आव्हाने आहेत हे जरी खरं आणि मान्य आहे. भविष्यात कोणाचीच नाराजी राहणार नाही.

जनतेचे प्रेम आणि विकासाच्या जोरावर दोनदा आमदार

शिवसेना वाढविण्यासाठी आम्ही अहोरात्र कामं केली आहे. मतदार संघात प्रेम आणि विकासाच्या जोरावर स्व.आर.ओ.तात्या आणि मी मतदार संघातील राजकीय परंपरा तोडत आम्ही दोन वेळा आमदार जनतेच्या प्रेमाने च झालो आहोत.मी आता नवीन पर्वाला सुरुवात केली आहे. आमच्या या भूमिकेमुळे जुने-किंवा नवे जेष्ठ पदाधिकारी नाराज असतील त्यांच्याशी संपर्क करून त्यांची नाराजी दूर करण्याचा माझा प्रयत्न राहील.भविष्यातील राजकीय वाटचाल कशी राहील कोणत्या चिन्हावर पुढील निवडणूका लढवली जाईल हा सर्व निर्णय हे आमचे नेते -मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे घेतील.

कारण ही सर्व न्यायालयीन प्रक्रिया असून11 जुलै नंतरच पुढचे चित्र स्पष्ट होणार असल्याने मी यावर काही सांगू शकत नाही. मध्यावधी निवडणूक बाबत ज्या काही भविष्यवाणी होत असल्या तरी जे कोणी बोलत आहे तसे कधी घडत नाही. तसेच शिवसेनेत बंडाळीला सेना नेते संजय राऊत हेच कारणीभूत असल्याचे म्हणाले. आगामी काळातील राजकीय वाटचाली बाबतीतही आ.किशोर पाटील यांनी थोडक्यात माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या