Sanjay Raut : "दीडशहाणे मंत्री..."; दादा भुसेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा संताप

Sanjay Raut : "दीडशहाणे मंत्री..."; दादा भुसेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा संताप

मुंबई | Mumbai

काल राज्याचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी माध्यमांशी बोलताना "कांदा परवडत नसेल तर खाऊ नका, दोन चार महिने कांदे खाल्ला नाही तर काय बिघडणार आहे? असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळासह शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दादा भुसेंच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे...

Sanjay Raut : "दीडशहाणे मंत्री..."; दादा भुसेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा संताप
Nashik News : कर नाही, रेशन नाही! गोरठाण ग्रामपंचायतीच्या अजब ठरावाने खळबळ

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, यांच्या घरी कांद्याची (Onion) पोती आहेत आणि सामान्य माणसाला कांदा आणि भाकरी खायची आहे. कांदा हे गरिबांचं खाणं आहे, हे श्रीमंतांचं खाणं नाही. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा हे आमचं म्हणणं आहे. सामान्य घरातील गृहीणी कांद्यापासून वंचित राहू नये हे आमचं म्हणणं आहे. पण सरकार म्हणत असेल की एखादी गोष्टी मिळत नसेल तर खाऊ नका, तर मग सरकार (Government) कशाकरता आहे? हे दीडशहाणे मंत्री कालपर्यंत महाराष्ट्राचे कृषीमंत्री होते. त्यांना या राज्याची स्थिती माहिती आहे का?" असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

Sanjay Raut : "दीडशहाणे मंत्री..."; दादा भुसेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा संताप
केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; नाशिक, अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र

पुढे बोलतांना ते म्हणाले की, "कांद्यामुळे भाजपचं (BJP) दिल्लीचं सरकार गेलं होतं. महाराष्ट्रातही (Maharashtra) तीच वेळ आली आहे. हा मस्तवालपणा आहे. आम्ही जनतेशी कसंही वागू शकतो, जनतेला काही बोलू शकतो, जनतेला काही सल्ले देऊ शकतो हा मस्तवालपणा आहे. हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झाला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून खाऊ नका, अरे तुम्ही उपलब्ध करून द्या. हा काय सल्ला झाला काय?", असेही संजय राऊत यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Sanjay Raut : "दीडशहाणे मंत्री..."; दादा भुसेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा संताप
Chandrayaan-3 Mission: जर चांद्रयान-३ उद्या उतरले नाही तर...; कशी असणार लँडिंगची प्रक्रिया
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com