Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय राऊत, संजय पवार यांचे अर्ज दाखल; संभाजीराजे काय निर्णय...

शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय राऊत, संजय पवार यांचे अर्ज दाखल; संभाजीराजे काय निर्णय घेणार?

मुंबई । Mumbai

राज्यसभेच्या ६ जागांसाठी लवकरच निवडणूक (Rajya Sabha Election 2022) पार पडणार असून संभाजीराजे छत्रपतींच्या (Sambhaji Raje Chhatrapati) उमेदवारीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (Shivsena) उमेदवार संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

- Advertisement -

विधान भवनातील निवडणूक कार्यालयात या दोघांकडून अर्ज सादर करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह मविआतील अनेक मंत्री व नेते हजर होते.

महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. महाविकास आघाडी सहा पैकी ४ जागा निवडून आणणारच असा विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसंच शिवसेना कुणाच्याही दबावाला भीक घालत नाही, भाजपाने तिसरा उमेदवार दिला तरी विजय आमचाच आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेची एक जागा निवडून येण्यासाठी 42 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा राज्यसभेचा मार्ग जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.

संभाजीराजे काय निर्णय घेणार?

दरम्यान राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष लढण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेले संभाजीराजे छत्रपती माघार घेण्याची शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा न दिल्याने संभाजीराजे माघार घेऊ शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या