आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल- राऊतांचा पवारांना इशारा

आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल- राऊतांचा पवारांना इशारा
संजय राऊत

“राज्यात जरी सत्ता असली, तरी या भागात आपलं कुणी ऐकत नाही. पालकमंत्री आपले नाहीत, अशा तक्रारी शिवसेनेच्या मेळाव्य झाल्या. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)यांनी राष्ट्रवादीला (ncp)इशाराच दिला. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अजित पवार (ajit pawar)देखील उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले. लागलीच त्यावर खुलासा करत ते म्हणाले, “मुख्यंमत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या आम्हाला दिल्लीवर देखील राज्य करायचं आहे. साऊथ ब्लॉक, पंतप्रधान कुठे बसतात, गृहमंत्र्यांचं कार्यालय कुठे आहे, तिथे आपल्याला टप्प्याटप्प्याने पोहोचायचं आहे. या सगळ्याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत आहे. त्यामुळे अजित पवारांना आम्ही सांगू की आमच्या लोकांचंही ऐकत जा तुम्ही, आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल”, असं राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत
गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात चार दिवस पाऊस

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राऊत बोलत होते. यावेळी शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहुल कलाटे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राज्य संघटक गोविंद घोळवे शहरप्रमुख सचिन भोसले, धनंजय अल्लाट आदी उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले की, पालकमंत्री अजित पवार हे ऐकत नाहीत अशी शिवसैनिकांची भावना आहे. आम्ही त्यांच्याशी बसून बोलू. आमच्या लोकांना नाराज करू नका, माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आत्ताच सांगितले की, येथील पोलीस आयुक्त आमचे ऐकत नाहीत. त्यांनाही मी सांगतो की सरकार आमचे असेल तर आमचे ऐकायलाच हवे.

Related Stories

No stories found.