परमबीर सिंग यांच्या चौकशीला पोलीस महासंचालक पांडेंचा नकार

परमबीर सिंग
परमबीर सिंग

मुंबई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बरीच उलथापालथ झाली. आता पोलीस महासंचालक संजय पांडे यांनीही राज्य सरकारला एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थता दाखवली आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहखात्याला एक पत्र लिहिले आहे. परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात संजय पांडे यांच्या विरोधात याचिका केली आहे. त्यात अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी वसूली प्रकरणी आरोप मागे घेण्यासाठी संजय पांडे दबाव टाकत असल्याचे आरोप करण्यात आले आहे. त्यानंतर संजय पांडे यांनी परमबीर सिंग यांच्या चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सरकारला त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी नेमावा लागेल.

संजय पांडे नाराज

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी बदली केल्यानंतर संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याआधी एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. आपली क्षमता असूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही, असेही त्यांनी याआधी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com