मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

मुंबई । Mumbai

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात (Raj Thackeray) सांगलीमधील (Sangli) शिराळा (Shirala) न्यायालयाने (Court) अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) काढले असून राज ठाकरेंना ११ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत...

वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी (Shirala Magistrate) २८ एप्रिल २००८ रोजी राज ठाकरे यांच्यासह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. याप्रकरणी ८ जूनला सुनावणी (Hearing) झाली असता राज ठाकरे गैरहजर राहिले. यानंतर कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे.

दरम्यान, शिराळा कोर्टाने २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनाप्रकरणी (agitation) एप्रिल महिन्यात वॉरंट काढले होते. पण राज ठाकरेंना करोनाची (corona) लागण झाली असल्याने बुधवारी झालेल्या सुनावणीला गैरहजर राहिले. यावेळी मनसेचे नेते शिरीष पारकर (Shirish Parkar) या सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांना कोर्टाने जामीन (Bail) मंजूर केला. पण राज ठाकरे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

२००८ ला रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यात मनसेचे जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी जवळ आंदोलन करून दुकानांची तोडफोड केली होती. यानंतर याबाबतचा गुन्हा शिराळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहित दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यामध्ये राज ठाकरे यापूर्वी एकदा न्यायालयात हजर देखील झाले होते. मात्र पुढील तारखांना गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने आता राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट काढले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com