बळीराज्याच्या हातात आलेला घास मेंढ्यांच्या तोंडात!

बळीराज्याच्या हातात आलेला घास मेंढ्यांच्या तोंडात!

संगमनेर | तालुका प्रतिनिधी

टोमॅटोला योग्य बाजार (tomato market rate) भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतात मेंढ्यां चरण्यासाठी सोडल्या. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील शेतकरी शशिकांत कढणे यांनी टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याने एक एकरवरच्या टोमॅटोच्या शेतात बकऱ्या चरण्यासाठी सोडल्या. टोमॅटोचे दर कमालीचे घसरल्यानं सध्याच्या बाजारभावात उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतात मेंढ्यां सोडण्याचा निर्णय घेतला.

बळीराज्याच्या हातात आलेला घास मेंढ्यांच्या तोंडात!
मूर्ती घडविणारा वडार समाज लढतोय अस्तित्वाची लढाई

चंदनापुरी गावांतर्गत असलेल्या आपटेमळा येथे शशिकांत कढणे हे शेतकरी राहात आहे. टोमॅटोला चांगले बाजारभाव मिळेल या आशेवर त्यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये मल्चिंग पेपरवर टोमॅटो पिकाची लागवड केली होती. त्यासाठी ठिबक सिंचनही केले होते. खते औषधे, मजुरी असा जवळपास सव्वा लाख रूपयांच्या आसपास खर्च झाला होता.

टोमॅटोचा फडही चांगला होता मात्र टोमॅटो तोडायला आली आणि बाजारभाव कोसळले. त्यात पुन्हा टोमॅटो तोडण्यासाठी मजूर घ्यायचे. त्यामुळे संतप्त झालेल्या कढणे यांनी एकही टोमॅटोचा तोडा न करता टोमॅटो पिकात थेट मेंढ्या सोडून दिल्या आहेत. टोमॅटो पिकाचे चांगले पैसे होतील अशी अपेक्षा होती मात्र सर्वच खर्च कढणे यांच्या अंगलट आला आहे.

बळीराज्याच्या हातात आलेला घास मेंढ्यांच्या तोंडात!
धुणे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू, हृदय पिळवटून घटना

कांदा, कोबी, फ्लॉवर, झेंडू ही सर्व पिके घेतली होती, मात्र त्यामध्येही काहीच परवडले नाही. त्यामुळे टोमॅटोचे पिक घेतले पण काहीच उपयोग झाला नाही. टोमॅटोचा एकही तोडा न करता टोमॅटोच्या पिकात मेंढ्या सोडून दिल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शेती संपूर्ण तोट्यात आहे. झालेला खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे नेमकी कोणती पिक घ्यावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शशिकांत कढणे, शेतकरी

बळीराज्याच्या हातात आलेला घास मेंढ्यांच्या तोंडात!
सीरिअल किलर 'चार्ल्स शोभराज' अखेर तुरुंगाबाहेर... त्याची गुन्ह्यांची कुंडली वाचून तुम्ही हैराण व्हाल
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com