Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या‘संदर्भ’ रुग्णालय व्हेंटिलेटरवर

‘संदर्भ’ रुग्णालय व्हेंटिलेटरवर

नाशिक | Nashik

नाशिक विभागात (Nashik Division) मोठ्या आजारांवरील उपचारांसाठी २००८ मध्ये शालिमार (Shalimar) येथे संदर्भ सेवा रुग्णालय (Sandarbha Seva Hospital) उभारण्यात आले.

- Advertisement -

मात्र , आजची परिस्थिती बघता अनेक विभागातील मशिनरी एकतर खराब झालेली आहे किंवा बंद पडून धूळखात पडलेली आहे. यात प्रामुख्याने हृदयरोग, मूत्रपिंड आणि कर्करोग या दुर्धर आजारांचा समावेश आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा (Mahatma Phule Janaarogya Yojana) सर्वाधिक लाभ या रुग्णालयाद्वारे रुग्णांना मिळाला आहे. या रुग्णालयात केवळ १०० बेड असल्यामुळे ते रुग्णसंख्येच्या तुलनेत अपुरे पडतात. तसेच, संदर्भ सेवा रुग्णालयात अनेकदा खाटांची कमतरता भासते . वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णांनाही या गैरसोयीचा सामना करावा लागतो. रुग्णालयात केवळ उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातूनही नागरिक उपचारासाठी येतात.

सद्य:स्थितीत संदर्भ सेवा रुग्णालयातील खाटा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या समस्येबरोबरच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामधील मूत्रपिंड विकारतज्ज्ञ (Kidney pathologist), मूत्रपिंड विकार शस्त्रक्रियातज्ज्ञ, हृदयविकार शस्त्रक्रियातज्ज्ञ, हृदयविकार बधिरीकरणतज्ज्ञ, हृदयविकार उपचार तज्ज्ञ अशी विशेषज्ज्ञांची पदे रिक्त आहे. तसेच, कर्करोगग्रस्तावरील उपचारासाठी असलेल्या रेडिएशन मशीन (Radiation machine), ब्रेकी थेरपी मशीन बंद आहे. तर, हृदयरोग विभागाच्या शस्त्रक्रियेसाठी असलेले कॅथलॅब मशीन ही मुदतबाह्य झाली आहे.

तसेच मूत्रपिंड विभागातील (Department of Kidneys) सर्वचयंत्रणा मुदतबाह्य असून नुकतीच शस्त्रक्रिया विभागात नवीन मशीन बसविण्यात आली आहे. रुग्णालयांतील ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen Cylinder) पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनही लिक असल्याची तक्रार आहे.

हृदयरोग विभाग हृदयरोग विभागातील कॅथलॅब मशीनचा इंडोस्पॉटची मुदत संपली आहे. ही यंत्रणा नवीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून मजुरी मिळालेली असून अमरावती (Amravati) आणि नाशिकच्या संदर्भ रुग्णालयांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया दोन वर्षांपासून रखडलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या