
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
लतादीदींच्या (Lata mangeshkar) स्मृतिदिनानिमित्त आज सर्वत्र आदरांजली (tribute) वाहण्यात येत आहे. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने लातादींच्या स्मृतींना अभिवादन केले आहे, प्रसिद्ध रेतीशिल्पकार (Sand Sculptor) सुदर्शन पटनायक यांनीही लतादीदींना त्यांच्या कलेच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. ओडिसाच्या (Odisha) पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर सुदर्शन यांनी लता मंगेशकर यांची वाळूपासून मूर्ती साकारत अभिवादन केले आहे...
स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. आजही त्यांची गाणी आणि आठवणी सर्वांच्या मनात जिवंत आहेत. लता मंगेशकरच्या चाहत्यांनी त्यांना त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
लता मंगेशकर यांची ही मूर्ती ६ फूट उंच आहे. तसेच मूर्तीवर लिहिले आहे, 'मेरी आवाज ही मेरी पेहचान है', 'ट्रिब्यूट टू भारतरत्न लता जी' (Tribute to Bharat Ratna Lata Ji). लता मंगेशकर यांची ही कलाकृती साकारताना सुदर्शन यांनी अनेक रंगांचा वापर केला आहे. त्यांनी वाहिलेल्या या अनोख्या आदरांजलीची सर्वत्र चर्चा होत आहे.
२००१ साली लता मंगेशकर यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी त्यांना पद्म भूषण, पद्म विभूषण आणि दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
लता मंगेशकर यांना कोरोना (Corona) आणि निमोनिया झाला होता. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुगणालयात (Breach Candy Hospitals) दाखल करण्यात आले होते. २९ दिवस लता मंगेशकर यांच्या उपचार सुरू होते. परंतु त्यांची ही लढाई अपयशी ठरली, गेल्या वर्षी ६ फेब्रुवारी, २०२२ रोजी निधन झाले.