Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रातील या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

उत्तर महाराष्ट्रातील या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

मुंबई :

जलजीवन मिशन (jal jeevan mission)योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना(Water supply schemes), राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil)यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या 60 पाणीपुरवठा योजनेस उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.

- Advertisement -

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक ऋषीकेश यशोद यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील मजीप्राअंतर्गत मान्यता मिळालेल्या योजना

अहमदनगर जिल्हा : बेलवंडी बु. पा. पु. योजना, ता. अहमदनगर, वाढीव मिरजगाव पा. पु. योजना ता. कर्जत, अहमदनगर, वारी कान्हेगाव पा. पु योजना ता. कर्जत, जि.अहमदनगर, माळेगाव थडी पा. पु. योजना ता. कोपरगाव अहमदनगर, निमगाव भोजापूर व ३ गावे पा. पु योजना ता.संगमनेर जि. अहमदनगर, जवळेकडलग व १ गावे पा. पु. योजना ता. संगमनेर जि.अहमदनगर, गुंजाळवाडी व १ गावे पा. पु. योजना, ता.संगमनेर जि. अहमदनगर,

नाशिक जिल्हा : चिंचवड व ६ गावे पा. पु. योजना ता. त्र्यंबक, जि. नाशिक

जळगाव जिल्हा : धानोरा, ता. चोपडा जि. जळगाव, उचंदे व ७ गावे, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या