Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक-दिल्ली-हैदराबाद विमानसेवेला मंजुरी

नाशिक-दिल्ली-हैदराबाद विमानसेवेला मंजुरी

नाशिक । प्रतिनिधी

लोकांचा उदंड प्रतिसाद लाभूनही काही महिन्यांपासून बंद असलेल्या दिल्ली, हैद्राबादसाठी येत्या दि.20 नोव्हेंबरपासून नव्याने विमानसेवा सुरू होत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसह शेती उत्पादकांसाठी नव्याने पुन्हा एक संधी उपलब्ध झाली आहे.

- Advertisement -

उडान सेवांतर्गत नाशिकहून दिल्लीसाठी विमान सेवा सुरू झाली होती. या विमानसेवेला ग्राहकांचा उदंड प्रतिसादही लाभलेला होता. पर्यटकांसोबत कार्गो सेवा देखील अतिशय सक्षमपणे सुरु असल्याने विमानसेवा अतिशय जोमात सुरू होती. मात्र विमान कंपनीच्या अंतर्गत अडचणींमुळे ही विमानसेवा बंद करण्यात आली होती.

त्यानंतर कोविडचा प्रश्न निर्माण झाल्याने पर्यटकांची संख्या घटली होती. परिणामी विमानसेवा सुरू करायला कोणी धजावत नव्हते. खा गोडसे यांनी सातत्याने प्रयत्न करून राष्ट्रीय कार्गो विमानसेवेसह आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी मिळवली होती. या पार्श्वभूमीवर येत्या वीस तारखेपासून दिल्ली

व हैदराबादसाठी स्पाईस जेट विमानसेवा सुरू होत असल्याने उद्योजक व्यापार्‍यांसह शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या सेवेअंतर्गत दिल्लीहून 3.15 मिनिटांनी विमान उडणार असून, नाशिकला 5.05 मिनिटांनी पोहोचणार आहे. त्यानंतर नाशिकहुन परत 5.35 मिनिटांनी उड्डाण घेऊन दिल्लीला 07:25 पोहोचणार आहे. याचप्रमाणे हैद्राबादहून सकाळी 10.35 मिनिटांनी उड्डाण घेऊन नाशिक येथे 12.05 मिनिटांनी पोहोचणार आहे. त्यापाठोपाठ नाशिकहून परतीचा प्रवास 12.35 मिनिटांनी सुरू करून 2.05 मिनिटांनी हैद्राबाद गाठणार आहे.

कोविड महामारीच्या काळात आपण आंतरराष्ट्रीय विमानसेवासह कार्गो सेवा नाशिक येथे सुरू करण्यासाठी मंजुरी मिळवली आहे. यासोबतच बंद झालेली नाशिक -दिल्ली विमान सेवा सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्याला मंजुरी मिळाली आहे. नाशिकच्या विकासाला यामुळे खर्‍या अर्थाने गती मिळणार आहे

हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या