नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी समृद्धीचे निकष लागणार

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

समृद्धी महामार्गासाठी ( Samruddhi Express Highway )जमिनी संपादन ( Land Acquisition ) करताना जे निकष लावले, त्यानुसार या प्रकल्पासाठीही शेतकर्‍यांना आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग ( Nashik-Pune railway line Project )प्रकल्पाच्या 80 टक्के खर्चाचा भार उचलण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने जाहीर केल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

पुणे ते नाशिक नियमित ये-जा करणार्‍यांची संख्या मोठी असून, त्यांच्यासाठी ही रेल्वेसेवा फायदेशीर आणि सोयीची ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नाशिक, अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांमधून हा रेल्वेमार्ग जाणार असून, त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत करण्यात येणार आहेत.

16 हजार 39 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, 80 टक्के खर्चाचा भार उचलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित करताना वापरलेला मोबदला परताव्याचा फॉर्म्युलाच या लोहमार्गासाठी भूसंपादन (Land acquisition for railways )करताना वापरण्याचा निर्णय गेल्याच आठवड्यात जिल्हा प्रशासनाने घेतला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *