
नाशिक | प्रतिनिधी Nashik
मुंबई ते नागपूर या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा ८० किमीचा शिर्डी ते भरवीर दुसरा टप्पा आज २६ मे २०२३ पासून सर्वसामान्य जनतेस वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
आज शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यावर शिर्डी ते भरवीर अंतर ४० ते ४५ मिनिटांत पार करता येणार आहे.
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा ५०१ किमीचा टप्पा सुरू झाला आहे. त्यापैकी शिर्डी ते भरवीर पर्यंतचे ८० किमी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिर्डी ते भरवीर पर्यंतचा ८० किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे.