
मुंबई | Mumbai
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशीसंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. आर्थिक अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली होती. आर्यन खानची (Aryan Khan) मुक्तता करण्यासाठी वानखेडेंनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितले होते, शेवटी 18 कोटींना डील पक्की झाली होती, असं सीबीआयनं आपल्या एफआयआरमध्ये (FIR) म्हटलं आहे.
आर्यन खानला अंमली पदार्थांप्रकरणी सोडण्यासाठी तत्कालीन एनसीबीचे झोनल डारेक्टर समिर वानखेडे यांनी २५ कोटी रुपये मागितले होते, शेवटी 18 कोटींना डील पक्की झाली होती, असं सीबीआयनं आपल्या एफआयआरमध्ये (FIR) म्हटलं आहे, रक्कम ठरल्यावर त्यांना आधी टोकनची रक्कम म्हणून ५० लाख रुपये ही घेतल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे. एवढंच नाही तर महागडी गाडी आणि हाय-फाय ब्रँड्सच्या कपड्यांबद्दल वानखेडेंनी नीट माहिती दिली नाही, तसेच, परदेश दौऱ्याबद्दलही काही बाबी लपवून ठेवल्या असा सीबीआयला संशय आहे.
या आधी वानखेडे यांच्या मुंबई येथील घरावर सीबीआयने छापा टाकला होता, गोरेगाव पश्चिमेकडील इम्पेरियल हाइट्स या इमारतीच्या सी विंगमधील वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली होती.
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साक्षीदार के. पी. गोसावी याने आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी उकळण्याची योजना आखली होती”, असा खुलासा सीबीआयने एफआयआरमध्ये केला आहे.
दरम्यान, समीर वानखेडेंना सीबीआयनं समन्स पाठवलं असून आपला जबाब नोंदवण्यासाठी त्यांना गुरुवारी, म्हणजेच 18 मे रोजी, नवी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देशभक्त होण्याची ही शिक्षा
"सीबीआयनं माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि 12 तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. छापेमारीत 18 हजार रुपये आणि मालमत्तेसंदर्भातील काही कागदपत्रं सीबीआयकडून जप्त करण्यात आली. मी सेवेत रुजू होण्यापूर्वी ही मालमत्ता खरेदी केली होती आपण कायदा मानणारे असून मी कारवाईला सामोरं जायला तयार असल्याचे वानखेडे यांनी सांगितलं. CBI नं समीर वानखेडे यांच्या 4 मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली आहेत.
देशभक्त होण्याची ही शिक्षा असल्याचंही समीर वानखेडे बोलले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सहा अधिकाऱ्यांच्या पथकानं अंधेरीतील माझ्या वडिलांच्या घरावर छापा टाकला आणि काहीही सापडलं नाही. सीबीआयच्या सात अधिकाऱ्यांच्या आणखी एका पथकानं माझ्या सासरच्या घरीही छापे टाकले. माझे सासूसासरे वृद्ध आहेत.