Maratha Reservation : संभाजीराजे- मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष

Maratha Reservation : संभाजीराजे- मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष

मुंबई

छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकानी ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. ही बैठक संध्याकाळी ५ वाजता वर्षा बंगल्यावर होणार आहे. या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Maratha Reservation : संभाजीराजे- मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष
कोव्हॅक्सीनवर राजकारण : गायीच्या बछड्याचा आरोपानंतर भाजप आक्रमक

सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, सुपर न्यूमरी, वसतिगृह, ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला सवलती, कोपर्डी पीडितेला न्याय मिळावा, या मागण्या मराठा क्रांती मोर्चाने केल्या आहेत.

कोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने संभाजीराजे यांना भेटीच निमंत्रण दिलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमिती सदस्य आणि छत्रपती संभाजीराजे तसेच राज्य समन्वयक उपस्थित असणार आहेत. राज्य समन्वयक करणं गायकर, राजेंद्र कोंढरे, रगुनाथ चित्रे पाटील, अंकुश कदम, विनोद साबळे, रमेश केरे आदी समन्वय बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com