MPSC परीक्षा घेतल्यास गंभीर परिणाम

खासदार संभाजीराजे यांचा ईशारा
खासदार संभाजीराजे
खासदार संभाजीराजे

मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा MPSC होऊ देणार नाही. कारण ही परीक्षा झाली तर त्याचे गंभीर परीणाम भोगावे लागतील. MPSC परीक्षते ४२७ विद्यार्थी पास झाले. त्यातील १२७ मराठा आहेत. त्यांच्या नियुक्त्या रखडल्या, त्याला जबाबदार कोण?, असा प्रश्न खासदार संभाजीराजेंनी विचारला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचीपरीक्षा घेण्यासाठी सरकार घाई का करत आहे? यामागे काही षडयंत्र आहे का कळत नाही. ज्यांची वयाची मर्यादा संपेल त्यांची वयाची अट शिथिल करुन मर्यादा वाढवा सर्वांना सोबत घेऊन चला, अशी माझी सरकारला सूचना आहे असंही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

नवी मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आणि पदधिका-यांची बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांसाठी जे आरक्षण दिले होते, त्यात मराठा समाजच वंचित राहिला आहे. आता या मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते सर्व १८ पगड जातीचे होते. आज जाती विषमता कमी व्हायला हवी पण ती वाढतेय, मी सर्व समाजाचा आहे, पण आज मराठा समाज बाहेर फेकला गेला आहे. का बाहेर फेकला गेला मराठा समाज? असा सवाल खा. संभाजीराजेंनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com