राज्यसभा निवडणूक : 'अशी' असू शकते संभाजीराजे छत्रपतींची पुढील वाटचाल

खासदार संभाजीराजे
खासदार संभाजीराजे

मुंबई । Mumbai

राज्यसभेच्या (rajya sabha election) सहाव्या जागेवरुन अपक्ष लढण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेले संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje chhatrapati) आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी (BJP and Mahavikas Aghadi) यांच्यापैकी कोणीही पाठिंबा न दिल्याने संभाजीराजे यांच्यावर न लढताच माघार घेण्याची नामुष्की ओढावली आहे....

एवढेच नव्हे तर राज्यसभा निवडणुकीचा अर्ज (Application for Rajya Sabha election) दाखल करून घेण्यासाठी लागणारे १० आमदारांचे अनुमोदनही संभाजीराजे छत्रपती यांना जमवता आलेले नाही. अर्ज (Application) भरताना ही परिस्थिती असेल तर प्रत्यक्ष निवडणुकीतही संभाजीराजे यांना कितपत पाठिंबा मिळेल, याबाबत साशंकताच आहे.

त्यामुळेच संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे. याबाबत संभाजीराजे छत्रपती शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने (shivsena) संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांनी ती ऑफर नाकारत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तसेच संभाजीराजे यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष आमदारांनी आपणास सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

त्यानुसार, शेकाप आमदार महेंद्र थोरवे (MLA Mahendra Thorve) यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली होती.मात्र, या साऱ्या घडामोडीनंतर संभाजीराजे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, संभाजीराजे यांनी फेसबुकवर दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती. यामध्ये संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवषयी अप्रत्यक्षपणे का होईना, पण नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचे आहे. मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील आहे, असे संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com