Video : मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजे 27 मे रोजी मुंबईत भूमिका मांडणार

Video : मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजे 27 मे रोजी मुंबईत भूमिका मांडणार

नाशिक | Nashik

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळवणे हा मराठा समाजाचा हक्क आहेच. मराठा आरक्षणाप्रश्नी 27 मे रोजी मुंबईत भूमिका मांडणार असून मुख्यमंत्री, विरोधकांना भेटणार असे खासदार संभाजीराजे भोसले (sambhaji raje bhosale) यांनी गुरुवारी नाशिकमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितले. मराठा आरक्षण ही केंद्राची जबाबदारी आहे की राज्याची याच्याशी मला काही घेणे देणे नाही. यातून मार्ग काय काढून देणार आहे? तेच आम्हाला हवे आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींना आतापर्यंत ४ वेळा पत्र लिहिले आहे. मोदींकडे 4 वेळा वेळ मागितली, पण अजून मिळाली नाही, पुन्हा संपर्क करणार आहे. आक्रमक होण्यासाठी 2 मिनिटे लागणार नाही. 27 मे पर्यंत राज्य सरकारने अभ्यास करावा, माझी भूमिका 27 ला मांडणार. 27 मे पर्यंत शांतता राखा. त्यानंतर भूमिका ठरवू. या भूमिकेतून कदापि माघार घेणार नाही.

समाजाने 27 तारखेपर्यंत समाजाने राहावे, आपली भूमिका त्या दिवशीच ठरेल. 4 एप्रिलला स्टेज वर जाण्याचं कोणाचं धाडस होत का, मी गेलो होतो बोलायला, आझाद मैदानात मी गेलो होतो, माझ्यावर टीका करणारे तेव्हा कुठे? सुप्रीम कोर्टाने सांगून ही नियुक्ती का देत नाही? मुख्यमंत्री नी नोकऱ्या द्यावे, सारथी संस्थेचे शाहू महाराज यांचे नाव काढून टाका, काहीच करत नाही, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असे संभाजीराजे यावेळी म्हणाले.

Video : मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजे 27 मे रोजी मुंबईत भूमिका मांडणार
केंद्राचा मोठा निर्णय : कोरोना मुक्तीनंतर तीन महिन्यांनी घेता येणार लस

मला आंदोलन शिकवू नका

2007 पासून संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आंदोलन काय आहे, हे मला शिकवण्याची गरज नाही. राजवाडा असला तरी मी त्यात चार दिवस राहतो व ‌‌उर्वरित दिवस मी समाजाचे काम करतो. समाजातील तज्ज्ञ लोकांशी चर्चा करणार आहे. त्यासाठीच आज नाशिकमध्ये आलो आहे. उद्या सोलापूरला जाणार आहे. त्यानंतर 27 रोजी भूमिका जाहीर करणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com