मालेगावातील घटनेने सलमान खान नाराज, म्हणाला...

मालेगावातील घटनेने सलमान खान नाराज, म्हणाला...

चाहत्या आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी काय करतील याचा नेम नाही. त्यातच जर सलमान खानचे (salman khan) चाहते असतील तर विचार करायची सोय नाही. सलमान खानचा अंतिम सिनेमा (anthim movie) रिलीज झाला आहे. मालेगावमध्ये (malegaon) शो सुरू असताना सलमानच्या एंट्रीवर चाहत्यांनी चक्क थिएटरमध्ये फटाके फोडले. हा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी केलेल्या प्रकारावर सलमान खान नाराज झाले आहे.

सुभाष चित्रपटगृहात ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रदर्शनात सलमान खानची एंट्री हाेताच त्याच्या काही चाहत्यांनी थेट चित्रपटगृहातच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लाेष केला. या आतषबाजीचे व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मागील नऊ महिन्यांत दुसऱ्यांदा खान चाहत्यांनी उपद्रव केल्याने चित्रपटगृह चालक हादरले आहेत.

मालेगावातील घटनेने सलमान खान नाराज, म्हणाला...
कतरिना-विकी लग्नातूनही असे मिळवणार पैसे

सलमान खान चाहत्यांच्या या प्रकाराने नाराज झाला आहे. त्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. सलमानने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, मी चाहत्यांना विनंती करतो की चित्रपटगृहात फटाके फोडू नका. यामुळे आग लागण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मी चित्रपट गृहांच्या मालकांना विनंती करतो की, त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहात फटाके घेऊन जाऊ देऊ नये. चाहत्यांनी चित्रपटाचा आनंद घ्यावा.

मालेगावातील घटनेने सलमान खान नाराज, म्हणाला...
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com