Wednesday, April 24, 2024
Homeजळगावदूध संघातून 1800 नव्हे तर 3350 किलो तुपाची विक्री

दूध संघातून 1800 नव्हे तर 3350 किलो तुपाची विक्री

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दूध संघातील (District Milk Union) बी ग्रेड तुप अपहरात (B grade ghee theft case) प्रकरणात एका महिन्यात चॉकलेट व्यावसायीक रवी अग्रवाल (Ravi Aggarwal is a chocolate businessman) यांना 1 हजार 635 किलोतुप विक्री केले असून त्याच महिन्यात अनिल अग्रवाल ()Anil Aggarwal यांना 1 हजार 725 किलो बी गे्रड तुपाची विक्री (Sale of B Grade Ghee) करण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघात 1800 किलोचा नाही तर तब्बल 3 हजार 350 किलो तुपाचा अपहार (Misappropriation of 3 thousand 350 kg of ghee) झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात (police investigation)उघड झाली आहे. संशयितांना न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

जिल्हा दूध संघात अखाद्य बी ग्रेड तुपाची विनापरवानगी कमी किंमतीत विक्री केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, प्रशासन प्रमुख चंद्रकांत पाटील, हरी पाटील, निखील नेहते, किशोर पाटील, अनिल अग्रवाल, रवी अग्रवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कठोडी संपुष्ठात आल्यानंतर त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

बर्फवृष्टीत अडकलेल्या चिंचखेडा येथील जवानाला वीरमरण

न्यायालयात युक्तीवादात सरकार पक्षाकडून बी ग्रेड तुप हे अखाद्य असल्याची कबुली कार्यकारी संचलाक लिमये यांनी चौकशीत दिली आहे. हे तुप विक्री करण्यासाठी त्यांनी ज्या निविद मागविल्या होत्या. त्यामध्ये अखाद्य तुप विक्रीबाबत कुठेही उल्लेख केलेला नव्हता. तसेच त्यांनी हे कृत्य नेमक्या कोणाच्या दबावाखाली करीत होते. त्याचा मुख्यसूत्रधार कोण याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून त्यानुसार संशयितांची चौकशी केली जात आहे. तसेच संशयितांनी किशोर पाटील याला फायदा व्हावा यासाठी त्याला एजन्सी देवून त्याला खाद्य तुप विक्रीचा परवाना दिला असतांना त्याने त्याद्वारे अखाद्य तुपाची विक्री केली असल्याचा युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर सर्व संशयितांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी युवकांनी योगदान द्यावे : राज्यपाल कोश्यारीअतिक्रमण काढताना हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू

विल्हेवाट शोधण्याचे आव्हान

तुप खरेदी करणारे अनिल अग्रवाल यांनी तुपाचे 6 डब्बे पोलिसांना काढून दिले आहे. परंतु हरी पाटील यांनी सादर केलेल्या बिलानूसार सतरा दिवसांमध्ये 6 वेळा म्हणजेच 1725 किलो तूप एकट्या अनिल अग्रवाल याने खरेदी केले केले असल्याने उर्वरीत 1380 किलो तुपाची विल्हेवाट शोधण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर राहणर असून तपासयंत्रणा त्यादृष्टीने तपास करीत आहे. त्याचप्रमाणे तुपाची विक्री करतांना संशयिताकडून अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे पालन केलेले नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

चाळीसगावात एकावर चॉपरने वार

मीडिया ट्रायल बंद करण्याची विनंती

न्यायालयात युक्तीवाद सुरु असतांना संशयितांच्या वकिलांकडून दूध संघातील बी ग्रेड तुप अपहरण प्रकरणात मीडिया ट्रायल होत असून ती बंद करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या