Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळाला पहिजे - विश्वास पाटील

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळाला पहिजे – विश्वास पाटील

धर्माच्या नावावर, पक्षाच्या नावावर, एखाद्या बाईच्या नावावर मोठ-मोठी मंडप सजत असतील तर भाषेच्या नावावर संमेलने का असू नये- विश्वास पाटीलमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळाला पहिजे – विश्वास पाटीलशिवरायांच्या स्मारकावर लाखो खर्च करा. पण त्यांच्या स्मृती जपल्या पाहिजे- विश्वास पाटीलमराठीतील शेक्सपियर म्हणजे तात्यासाहेब- विश्वास पाटीलआता यापुढे अध्यक्ष निवडतांना काळजी घेतली पाहिजे. हिंडता फिरता असणारा व्यक्तीची संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून निवड करावी, असे मला दोन उदाहरणावरुन वाटते. -अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटीलजयंत नारळीकर न आल्याबद्दल अखिल भारती मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी खेद व्यक्त केला. मागील संमेलनात फ्रान्सिस दिब्रिटो यांची प्रकृती चांगली नव्हती. त्यानंतरही ते कशा पद्धतीने संमेलनासाठी आले, त्याचे उदाहरण कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. त्यापद्धतीने जयंत नारळीकर आले असते आणि तासभर बसले असते तर चांगले झाले असते, असे त्यांनी सांगितलेदिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत भुजबळ यांनी बळीराजापुढे दिल्लीकरांना नमावे लागल्याचे सांगितले.साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्याने असू नये असे काहींना वाटते, ते मला उचित वाटत नाही. ‘साहित्य आणि राजकारण वेगळे नाही’-भुजबळनाशिकचा माणूस दुसर्‍याला भरभरून देत असतो. उदारता हा नाशिककरांचा गुण आहे.-भुजबळमराठी भाषेची होणारी गळचेपी आपण थांबवली पाहिजे-भुजबळमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही त्यांची शिफारस गेली 7 वर्षे केंद्र सरकारकडे पडून आहे.-भुजबळख्रिस्ती धर्म प्रभावातून मोठी साहित्य निर्मिती कविवर्य रेव्हरंड नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांनी केली-भुजबळघाट देवळांचे शहर असलेल्या नाशिकची वाटचाल मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे झाली.-भुजबळनाशिक परिसरात मुगल मराठ्यांच्या अनेक चकमकी झाल्या. त्यात मराठ्यांना विजय मिळत राहिला. 1752 मध्ये झालेल्या भालकीच्या तहात गोदावरी व तापी नदी मधील प्रदेश निजामाने मराठ्यांना दिला.-भुजबळनाशिक पुन्हा एकदा साहित्यचर्चेच्या व माध्यमांच्या केंद्रस्थानी आले आहे. श्रीक्षेत्र नाशिक त्रंबकेश्वरला प्राचीन इतिहास आहे. नाशिकला दक्षिण भारताची काशी म्हणतात. ‘काशीस जावे : नित्य वदावे’ अशी एक उक्ती प्रचलित आहे.- भुजबळविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लेखिका सुधा मुर्तींसह अनेक मान्यवरांचे शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखवण्यात आले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर, ९३ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मान्यवर प्रकृती अस्वस्थामुळे संमेलनास हजर राहू शकले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या