
मुंबई | Mumbai
माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी ईडीने ( ED) सदानंद कदम यांची चौकशी केली, चार तासाहून अधिक काळ चाललेल्या चौकशीनंतर आज दि. १० रोजी सायंकाळी सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे.
दापोली येथील एका साई रिसॉर्ट (Sai Resort) प्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने सदानंद कदम यांना अटक केली आहे. आज त्यांची मुंबईत चार तासांहून अधिक वेळ चौकशी केल्यानंतर ईडीने अखेर कदम यांना अटक केली.
दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात नियमांचे उल्लंघन इतर बाबतीत अनियमितता या कारणांनी हे प्रकरण ईडीपुढे आले आहे. तसेच या प्रकरणी मनी लॉनड्रिंग झाल्याचा आरोप करत ED ने गुन्हा केला होता.