राजू शेट्टी- खोत
राजू शेट्टी- खोत
मुख्य बातम्या

दूध आंदोलनावरुन शेट्टी-खोत यांच्यात जुंपली

खोत म्हणतात- शेट्टी काजू शेट्टी झाले तर शेट्टी म्हणाले- खोत भ्रमिष्टासारखे बोलतात

jitendra zavar

jitendra zavar

मुंबई

भाजपने सुरु केलेले दूध दरावाढीचे आंदोलन राज्यात पेटले असताना एकेकाळचे दोन सहकारी सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले. राजू शेट्टी हे काजू शेट्टी झाले आहेत. त्यांची अवस्था वळू सारखी झाल्याच्या घणाघात माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य शेट्टी यांच्यावर केली तर आंदोलनात शेतकरीच न दिसल्याने खोत हे भ्रमिस्थासारखे बोलत असल्यानचे जाेरदार प्रत्युत्तर शेट्टी यांनी दिले.

भाजपच्या नेतृत्वात महायुतीच्या वतीने दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनावरून राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले "राजू शेट्टी आता हे काजू शेट्टी झाली आहेत आणि या भंपक माणसाला कोणी किंमत देत नाही. त्यांची अवस्था वळू प्रमाणे झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्याप्रमाणे सोडले आहे. शेट्टींनी चारशे एकर जमीन घेऊन ठेवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद दिले जाणार होते, मात्र राजू शेट्टी यांनी स्वतःला मंत्रीपद हवे असल्याने भुयार यांना मंत्री पद मिळू दिले नाही.

राजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ खोत यांच आंदोलन फसले. त्यांच्या आंदोलनात शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता. त्यामुळेच ते पिसाळले आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते भ्रमिस्थासारख बोलले असावेत. माझी चारशे एकर जमीन दाखवून द्या. ती विकून कडकनाथ मधील लोकांचे पैसे परत करतो.

Deshdoot
www.deshdoot.com