भाजपचा मास्टरस्ट्रोक; विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी 'या' नेत्याला उमेदवारी

भाजपचा मास्टरस्ट्रोक; विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी 'या' नेत्याला उमेदवारी

मुंबई । Mumbai

भारतीय जनता पक्षाने (bjp) विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council elections) काल पाच जणांना उमेदवारी दिल्यानंतर आता सहाव्या जागेसाठी उमेदवार देऊन या निवडणुकीत मास्टरस्ट्रोक मारला आहे...

भाजपने विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Sanghatana) नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांचे नाव निश्चित (mlc election) केले असून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज (Independent candidature application) दाखल केला आहे.

त्यांच्या या अपक्ष उमेदवारीला भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचे पाच आणि अपक्ष सदाभाऊ खोत यांच्या रुपाने भाजप एकूण सहा जागा लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, खाेत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या उपस्थितीत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला . त्यानंतर ते विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची सागर बंगला येथे भेट घेण्यासाठी जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com