अंधेरी पोटनिवडणुकीत मशाल धगधगली;ऋतुजा लटकेंचा विजय

अंधेरी पोटनिवडणुकीत मशाल धगधगली;ऋतुजा लटकेंचा विजय

मुंबई | Mumbai

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly by-election)शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. यामध्ये लटके यांना ६६ हजार २४७ मते मिळाली...

तर दुसऱ्या क्रमांकांची मते नोटाला (NOTA)पडली आहेत. नोटाला १२ हजार ७७५ इतकी मते मिळाली असून अपक्ष उमेदवारांचे (independent candidates) डीपॉजित झाले आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्यासह एकूण सात उमेदवार होते.

दरम्यान, निकालानंतर माध्यमांशी बोलतांना ऋतुजा लटके म्हणाल्या की, सर्वप्रथम मी म्हणेण हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके (Ramesh Latke) यांचा आहे. त्यांनी त्यांची जी संपूर्ण राजकीय कारकीर्द होती त्यामध्ये जी जनसेवा केली, विकासकामे केली. त्याची पोचपावती ही विजयाने मिळालेली आहे. मतदारांनी त्याची ही एक परतफेड केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com