Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशव्लादिमीर पुतीन २०३६ पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष

व्लादिमीर पुतीन २०३६ पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी संविधानामध्ये केलेले बदलांना रशियाच्या नागरिकांनी मान्यता दिली आहे. या संविधान बदल करण्यासाठी मतदान घेण्यात आले. या मतदानात ६० टक्के मतदान झाले होते. त्यातील ७६ टक्के लोकांनी पुतीन २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी त्यांच्या बाजूने कौल दिला.

तेथील स्थानिक वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पुतीन यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. पुतीन यांनी जानेवारी मध्ये संविधानमध्ये बदलांचा प्रस्ताव मांडला होता.

- Advertisement -

त्यांची कारकीर्द देखील अनेक आरोपांमुळे वादग्रस्त राहिली आहे. २००० मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी अनेक दबाव तंत्राचा वापर मतदारांवर करणे, मतपत्रिकेमध्ये घोटाळा करणे, अधिकारांचा दुरुपयोग करणे आहे आरोप त्यांच्यावर करण्यात येतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या