Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशरशियाची स्पुतनिक V लस १८+ नागरिकांना मिळणार ?

रशियाची स्पुतनिक V लस १८+ नागरिकांना मिळणार ?

नवी दिल्ली

भारतात १ मे पासून लसीकरणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. देशात आतापर्यंत ४५+ वयोगटातील लोकांना लस दिली जात होती. आता १ मे पासून १८+ वयोगटातील सर्वांचेच लसीकरण केले जाणार आहे.

- Advertisement -

सिरम पाठोपाठ भारत बायोटेकने केली किंमत कमी

दरम्यान, या लसीकरणापूर्वी लसींच्या पुरवठ्याची सर्वात मोठी चिंता व्यक्त केली जात होती. पण, रशियाची लस स्पुतनिक V ने (Sputnik V)या सर्व चिंता दूर केल्या आहेत. १ मे रोजी स्पुतनिक V भारतात दाखल होत आहे. रशियाच्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (RDIF) अध्यक्ष किरिल दमित्रिव यांनी याबाबत माहिती दिली.

Corona vaccine : 18 + साठी आज दुपारी ४ वाजेपासून नोंदणी; जाणून घ्या कसे करावे रजिस्ट्रेशन

रशियाचे राजधानी मॉस्कोतील गामालेया इंस्टीट्यूटसोबत मिळून ही लस तयार करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (RDIF) चे प्रमुख किरिल दिमित्रेवच्या हवाल्याने रॉयटर्सने सांगितले की, स्पुतनिक V ची पहिली खेप १ मे पासून भारतात उपलब्ध होणार आहे. दिमित्रेवने दावा केला आहे की, स्पुतनिक V च्या पहिल्या बॅचमधून भारतातील १८+ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात मदत मिळेल.

किती टक्के प्रभावी

भारतात सध्या दोन लस उपलब्ध आहेत. यातील कोव्हॅक्सिनचा एफिकेसी रेट ८१%, तर कोवीशील्डचा ८०% आहे. अशात ९१.६% इफेक्टिवनेस असलेली रशियाच्या लसीने सर्वाधिक परिणाम पडू शकतो.

पाच कोटी डोस येणार?

स्पुतनिक V चे नेमके किती प्रमाणात डोस येणार याची माहिती देण्यात आली नसली तरी लसीचे किमान पाच कोटी डोस भारतामध्ये पाठवण्याचे नियोजन रशियाने केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला भारत या लसीचे आयात करेल आणि नंतर देशातच या लसीच्या निर्मितीला सुरूवात केली जाईल असेही सांगण्यात येत आहे..

- Advertisment -

ताज्या बातम्या