रशियाहून गोव्याला येणारे विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात

रशियाहून गोव्याला येणारे विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात

दिल्ली | Delhi

रशियाच्या मॉस्को येथून भारतात गोव्याच्या दिशेनं येणाऱ्या एका विमानाला बॉम्बन उडवण्याची धमकी मिळाल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. गोवा विमानतळावर एका ईमेलच्या माध्यमातून ही धमकी मिळाली.

रशियाहून गोव्याला येणारे विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात
MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

या विमानात २ लहान मुले आणि ७ क्रू मेंबर्स असे एकूण २३८ जण प्रवास करत आहेत. गोव्यात येण्यासाठी अजूर एअरलाइन्सच्या विमानाने (Azur Air chartered flight) रशियाच्या पेराम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. पण मध्येच त्याला सुरक्षेशी संबंधित अलर्ट जारी करण्यात आला.

अलर्टनंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे. उझबेकिस्तानमध्ये लँड केल्यानंतर तातडीनं या विमानात बॉम्ब शोधक पथक दाखल होत पुढील कारवाई सुरु केली.

रशियाहून गोव्याला येणारे विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात
बस दरीत कोसळून भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

दरम्यान १२ दिवसांपूर्वी मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या अझूर एअरलाइन्सच्या विमानाचे गुजरातमधील जामनगर येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. विमानात बॉम्ब असल्याची बातमी गोव्याच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला ई-मेलद्वारे मिळाली होती.

रशियाहून गोव्याला येणारे विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात
सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख

ई-मेल गांभीर्याने घेत गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोलने तातडीने विमानाच्या पायलटशी संपर्क साधला आणि त्याला जवळच्या विमानतळावर विमान उतरवण्यास सांगितले आहे. त्यानंतर रात्री उशिरा आलेल्या NSGच्या टीमने १० तास फ्लाइट, प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सामानाची झडती घेतली. मात्र झडतीत बॉम्ब किंवा काही संशयास्पद सापडले नाही. बॉम्बची बातमी खोटी निघाली.

रशियाहून गोव्याला येणारे विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात
राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले
रशियाहून गोव्याला येणारे विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात
अत्याचार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com