Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशरशियाने दिली सिंगल डोस व्हॅक्सीनला मंजुरी

रशियाने दिली सिंगल डोस व्हॅक्सीनला मंजुरी

शास्त्रज्ञानी सायन्सचा अभ्यास करून 30 दिवसानंतर दुसरा डोस घ्यायला सांगितला. पण अनेक रुग्णांना 50 ते 60 दिवस झाले तरी दुसरा डोस मिळालाच नाही. मग 30 दिवसाचे ऐवजी 45 ते 60 दिवसात दुसरा डोस घेण्याचे सांगितले. त्यानंतरही अनेकांना दुसरा डोस मिळत नाही. मग सिंगल डोसच्या लसीकडे वाटचाल सुरु झाली. आता रशियाने कोरोनाची सिंगल डोस व्हॅक्सीन तयार करण्यास यश मिळवले आहे. या लसीला स्पुतनिक लाइट नाव दिले आहे. ही लस विषाणूच्या सर्व नवीन स्ट्रेनवर प्रभावी आहे.

महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

- Advertisement -

भारतानेही स्पुतनिक V ला मंजूरी दिली आहे. 1 मे रोजी याची पहिली खेप भारतात आली आहे. यामुळे अपेक्षा केली जात आहे की, या नवीन सिंगल शॉट लाइट व्हॅक्सीनला येणाऱ्या काळात देशात मंजूरी मिळू शकते. स्पुतनिक लाइट 79.4% प्रभावी आहे. स्पुतनिक लाइट मॉस्कोच्या गमालय संशोधन संस्थेने बनवली आहे. या लसीची किंमत 10 डॉलरपेक्षा कमी (सुमारे 730 रुपये) असेल.

चाचणीत 79.4% प्रभावी

स्पुतनिक लाइट लसीच्या फेज-3 चाचणीमध्ये 7000 लोकांचा सहभाग होता. या चाचण्या रशिया, युएई आणि घाना येथे झाल्या. 28 दिवसांनंतर त्याच्या डेटाचे विश्लेषण केले गेले. परिणामांमध्ये असे आढळले आहे की ही लस विषाणूच्या सर्व नवीन स्ट्रेनवर प्रभावी आहे. त्याचा डेटा असे सूचित करतो की हे इतर अनेक डबल डोस लसींपेक्षा अधिक प्रभावी आहे.

स्पुतनिक लाइटचे फायदे

स्पुतनिक लाइट सिंगल डोस असल्यामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये लसीकरण वाढवले जाऊ शकेल. लस घेणाऱ्या 100% लोकांमध्ये 10 दिवसांनंतरच अँटीबॉडीज 40 टक्के वाढल्या. ही लस 2 ते 8 डिग्री टेम्प्रेचरवर स्टोअर केले जाऊ शकते. यामुळे ते सहज ट्रान्सपोर्ट होऊ शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या