करोना लस
करोना लस
मुख्य बातम्या

अखेर करोनावर लस आलीच

सर्व देशांना मागे टाकत रशियाने करोना व्हायरसची लस बनवली

jitendra zavar

jitendra zavar

रुस

जगातील सर्व देश मागे टाकत रशियाने करोनाव्हायरसची लस बनवली आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी घोषणा केली. मी माझ्या दोन मुलींपैकी एकाला प्रथम लस दिली, असे त्यांनी स्पष्ट केले. "Gam-Covid-Vac Lyo' असे या लसीचे नाव आहे.

रशियाचे राष्ट्रपती . ते म्हणाले की, 'आम्ही कोरोनाची सुरक्षित लस बनविली आहे आणि देशात त्यांची नोंद देखील झाली आहे. मुलीला ही लस दिल्यावर तिचा ताप ३८ डिग्रीपर्यंत गेला. त्यानंतर नियंत्रात आला '

एका महिन्यापूर्वी, रशियाने संकेत दिले होते की त्यांची लस चाचणीत आघाडीवर आहे आणि ते याची १० आणि १० ऑगस्ट दरम्यान नोंदणी करतील.

जागतिक आरोग्य संघटनेकडून यास मंजुरी मिळाली तर करोना लस बनवणारा रशिया पहिला देश ठरणार आहे. जगात करोना लस तयार करण्याचे अनेक ठिकाणी प्रयत्न सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतासह १०० ठिकाणी लस तयार केली जात आहे.

मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने ही लस विकसित केली आहे. या लशीमध्ये असलेले पार्टिकल्स पुन्हा स्वत:ला रेप्लिकेट (कॉपी) करू शकत नाहीत. संशोधन आणि लस उत्पादनात सहभागी झालेल्या अनेकांनीही लस टोचून घेतली असल्याचे वृत्त आहे.रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादनही सुरू होणार असे सांगितले. क्लिनकल ट्रायलदरम्यान संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी या लसीचा स्वत:वर प्रयोग केला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com