VIDEO : रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होतोय; निर्मला सीतारामन यांचे विधान

VIDEO : रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होतोय; निर्मला सीतारामन यांचे विधान

दिल्ली | Delhi

गेल्या काही महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु असून विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणाचे व्हिडीओ शेअर करून विरोधक भाजपवर निशाणा साधत आहेत. त्यातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुपयाच्या घसरणीवर अजब विधान केलं आहे.

रूपया घसरत नसून डॉलर सातत्याने मजबूत होत आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. रुपयाची पडझड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. निर्मला सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

निर्मला सितारामण यांनी आयएमएफसीला शुक्रवारी संबोधित केलं. तेव्हा त्या म्हणाल्या की, भारताचा परकीय चलनाचा साठा २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत ५३७.५ अब्ज डॉलर होतं. जे इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत चांगलं आहे. अमेरिकन डॉलर वधारल्याने मूल्यांकनात झालेल्या बदलामुळे परकीय चलनसाठ्यात घसरण झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com