Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशरूपयाची निच्चांकी घसरण कायम; तुमच्यावर काय परिणाम होईल?

रूपयाची निच्चांकी घसरण कायम; तुमच्यावर काय परिणाम होईल?

मुंबई | Mumbai

परदेशी गुंतवणूकदारांनी सातत्याने भांडवली बाजारातूल पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्याने भारतीय चलनाचा जबर फटका बसत आहे. आज प्रथमच डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८० रुपये प्रति डॉलरची घसरण पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

आज रुपया प्रति डॉलर ८० रुपयांच्या खाली गेल्याने व्यापाऱ्यांना प्रचंड नैराश्य आले आहे. यासह, रुपया या वर्षी ७ टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहे. रुपयाच्या घसरणीचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे.

भारतात अनेक वस्तू या परदेशातून आयात केल्या जातात. यात पेट्रोलियम पदार्थांसह खाद्यतेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा समावेश आहे. रुपयाची घसरण सुरु राहिली आणि डॉलरची किंमत वाढत राहिली तर आयात वस्तूंवर आपल्याला जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहे.

म्हणजे आयात वस्तूंवर खर्च वाढल्यास देशात विक्रीसाठी देखील त्या वस्तूंच्या किमती वाढणार आहे. रिफाइंड ऑईल, मोबाईल आणि लॅपटॉपपर्यंत अनेक वस्तू महाग होऊ शकतात.

तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्यामुळे विदेशातील शिक्षणासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून विदेशी शिक्षणसंस्थांची फी भरताना पालकांची दमछाक होणार आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे शिक्षणकर्जेही महागली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या