उर्फीच्या कपड्यांचा वाद पेटला; रुपाली चाकणकर चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर

उर्फीच्या कपड्यांचा वाद पेटला; रुपाली चाकणकर चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर

मुंबई | Mumbai

उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (chitra wagh) यांच्यातील वाद टोकाला पोहचला असून दोघींमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यानंतर आता हा वाद राज्याच्या महिला आयोगापर्यंत पोहोचला असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर (Rupali Chakankar) चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे...

याबाबत चित्रा वाघ यांनी एक ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, भाषा नको तर कृती हवी. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची (Maharashtra)संस्कृती आहे का? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीर प्रदर्शनाचे जे अतिशय बिभत्स आहे. राज्य महिला आयोग (State Commission for Women) समर्थन करत आहे का?, असा सवाल वाघ यांनी विचारला आहे.

दरम्यान, काल पत्रकारांशी संवाद साधतांना चित्रा वाघ यांनी 'उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नसून व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण मुंबईच्या (Mumbai) रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नंगटनाच जर कुणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. यावेळी आम्ही पोलिसात (Police) तक्रार केली आहेच. व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण यावर कारवाई व्हायलाच हवी, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला होता.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com