Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआरटीओच करेल वाहन कागदपत्रांची तपासणी

आरटीओच करेल वाहन कागदपत्रांची तपासणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वाहनधारकांची कागदपत्रे,लायसन्स,पियुसी तसेच हेल्मेट तपासणी करणे हे काम परिवहन विभागाचे (आरटीओ) आहे.

- Advertisement -

त्यामुळे यापुढे हा विभागच कागदपत्रांची तपासणी करेल. वाहतूक पोलिस हे फक्त वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम करेल. ते दंडांच्या स्वरुपातील महसूल गोळा करणार नाही. ते काम पोलिसांचे नाही असे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.२०) जिल्हाधिकारी ,पोलिस आयुक्त,पोलीस अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांची अवैध धंदयांच्या बाबत संयुक्त कारवाई करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलतांना पोलिस आयुक्त पांडे यांनी ही माहिती दिली. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर प्रवास करणार्‍या वाहनधारकांना विनाकारण अडवून त्यांच्या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करणार्‍या वाहतूक पोलिसांना आता वाहन धारकांच्या वाहनांची कागदपत्रांची तपासणी करता येणार नाही.

ते म्हणाले की, शहरातील वाहतूकीची होणारी कोंडी फोडणे हे मुख्य काम वाहतूक पोलिसांचेआहे. पण पोलिस कोंडी होत असतांनाही अनेकदा दंड वसूल करण्यावर लक्ष देतात. असे वारंवार निदर्शनास येते.वाहनधारकाला दंड करुन तो महसूल जमा करणे हे पोलिसांचे काम नाही. यापुर्वी तसे काम होत होते. पोलिसांना महसूल वसूलीचे

टार्गेट देण्यात येत होते.पण आता पोलिसांना असे कोणत्याही प्रकारचे टार्गेट दिले जाणार नाही.महसूल वसूल करणे ही जाबबदारी आरटीओ विभागाची आहे. या विभागाने त्यांचे काम करावे. त्यांना मदत म्हणून पोलिस सहकार्य करतील असेही पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी स्पस्ट केले. वाहन तपासणीच्या नावाखाली वाहतूक कर्मचारी यापूर्वी वाहनधारकांचा मानसिक व आर्थिक छळ करीत होते . त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उद्धवत असत .

पोलिस कर्मचारी व वाहन धारकांमध्ये यापूर्वी हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी शहरातील वाहतूक पोलिसांना यापुढे वाहने आडवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करता येणार नाही .

वाहतूक पोलिसाचे काम केवळ वाहतूक सुरळित करणे आहे . त्यामुळे आजपासून वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांना वाहनांच्या कागदपत्राची तपासणी करीता येणार नाही.ज्यावेळी वरिष्ठ पोलिस कार्यालयाकडून नाकाबंदी करण्याबाबत , वाहन तपासणीबाबत आदेश केल्यानंतरच वाहतूक कर्मचार्‍यांना तसापणी करता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या