Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासंघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचे निधन

संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचे निधन

नागपूर | प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते व ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. नागपूरमधील स्पंदन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुलगे धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ सह संयोजक) व बराच मोठा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत त्यांना

माधव गोविंद तथा बाबुराव वैद्य यांचा जन्म 11 मार्च 1923 रोजी वर्षा जिल्हपातील तरोडा येथे झाला होता. संस्कृत विषयात नागपूर विद्यापीठातून त्यांनी 1946 मध्ये एम. ए.ची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली होती.

माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर अध्यापनाचे कार्य केले. 1966 ते 1983 अशी तब्बत 17 वर्षे ते नागपूर तरूण भारतचे संपादक होते.

नंतर 1983 से 1996 या काळात नरकेसरी प्रकाशनचे प्रबंध संचालक आणि अध्यक्ष होते हिंदुत्व आणि अन्य विषयांवरची त्यांची अनेक पुस्तके प्रसिध्द आहेत.

स्पष्टोक्ते आणि निर्भिड पत्रकार अशी त्यांची महाराष्ट्रात त्यांची ख्याती होती. संघाचे बौध्दिक प्रमुख आणि अखिल भारतीय प्रचार प्रमुख या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या