<p>नवी दिल्ली</p><p>केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आज राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कामांविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे. जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग ७५३ च्या विस्तारीकरणासाठी २५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आहे.</p>.<p>जळगाव-मनमाड रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी केला जाणार आहे. या कामांसाठी कोट्यावधींचा निधी जाहीर करण्यात आला असल्याचे त्यांनी टि्वटच्या माध्यमातून सांगितले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध रस्तेकामांसाठी जवळपास २७८० कोटींची घोषणा करण्यात आली आहे. नितीन गडकरींनी गुरुवारी राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांच्या कामांविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. प्रगती का हायवे हा हॅशटॅग करत त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या रस्त्यांची कामसाठी निधी मंजूर करण्यात आला असल्याचे जाहीर केले. यामध्ये विशेषतः कोकणातील रस्त्यांचा समावेश आहे.</p>