निवडणूक घोषणा : गृहिणींना दरमहा २ हजार रुपये अन् मोफत ८ सिलिंडर

निवडणूक घोषणा : गृहिणींना दरमहा २ हजार रुपये अन् मोफत ८ सिलिंडर

पंजाब विधानसभा निवडणुकीचे (Punjab Assembly Elections) पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोफत वीज, पाणी अशी आश्वासनं दिली जात असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी गृहिणींना आकर्षित करणारी मोठी घोषणा केली आहे.

पंजाबमधील एका प्रचारसभेला बोलतांना नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यास राज्यातील प्रत्येक गृहिणीला दरमहा २ हजार रुपयांची मदत केली जाईल. तसंच वर्षाला ८ सिलिंडर सरकारकडून उपलब्ध करुन दिले जातील.

विद्यार्थीनींना मिळणार निधी

राज्यात इयत्ता ५ वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीला ५ हजार रुपये, १० वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीला १० हजार, तर इयत्ता १२ वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीला २० हजार रुपये दिले जाणार असल्याची घोषणा सिद्धू यांनी केली.

निवडणूक घोषणा : गृहिणींना दरमहा २ हजार रुपये अन् मोफत ८ सिलिंडर
गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com