अक्षय निकाळजे यांनी ठोकला शड्डू; मानहानीचा दावा दाखल करणार

५ ऑक्टोबरला आमदार सुहास कांदे यांचा नोंदवणार जबाब
अक्षय निकाळजे यांनी ठोकला शड्डू; मानहानीचा दावा दाखल करणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी पोलिसात खोटी तक्रार देऊन प्रशासनाची दिशाभूल केलेली आहे. तसेच माझ्या बदनामीसाठी पालकमंत्री भुजबळ (Guardian minister Chhagan Bhujbal) यांच्यासोबत माझे कनेक्शन जोडून मी आ. कांदे यांना धमकी दिली असल्याची तक्रार दिली असल्याने मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे....

तसेच पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांना सर्व प्रकरणाची सत्यता तपासून आमदार कांदे यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) (Republican party of India A) चे मुंबई प्रदेश अध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी दिली.... (Mumbai President)

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी समन्स बजावल्यानंतर आज जबाब देण्यासाठी निकाळजे यांनी आज गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) हजेरी लावली. तीन तास चाललेल्या जबाब नोंदणीनंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा नियोजन निधीच्या निधी वाटपावरून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या येवला मतदार संघासाठी जास्त निधी ताब्यात घेऊन नांदगाव मतदारसंघाला कमी निधी दिला असल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता.

त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका (High Court) देखील दाखल केली होती. दोघांच्या या वादामध्ये कुख्यात गुंड छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याच्याकडून ती याचिका मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा फोन आला असल्याची तक्रार आमदार कांदे यांनी पोलीस आयुक्तांना दिली होती.

मात्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे मुंबई प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी पत्रकार परिषद घेत या विषयी स्पष्टीकरण दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही समन्स बजावले होते. त्यानुसार अक्षय निकाळजे यांनी आज जबाब नोंदवला.

पुढे बोलताना निकाळजे यांनी सांगितले की, मी फोन केला होता पण टोल नाक्यावर माझ्या कार्यकर्त्याना मारहाण केली गेली. त्यासाठी त्यांना फोन केला होता. हा टोल नाका आमदार सुहास कांदे यांचे भाऊ चालवतात; यासाठी फोन होता.

मी फोनवर कुठलीही धमकी दिली नाही. तसेच मी कधीही मंत्री छगन भुजबळ यांना कधी भेटलो सुद्धा नाही. मी गेले चार- पाच वर्षे रिपब्लिकन पक्षाचे काम करतो आहे. राज्यात पक्षाचा विस्तार झाला आहे. युवकांमध्ये माझे चांगले स्थान आहे. आजवर माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. उलट आमदार कांदे यांच्यावर खंडणी, फसवणूक असे अनेक गुन्हे दाखल आहे.

एसीपी ऑफिसमधून मला फोन आला. रेकॉर्डिंग आहे का असेल तर द्या; त्याबाबत काही मेसेज देखील आले. तो क्रमांक तपासला तर त्या क्रमांकाचा एसीपी ऑफिसशी संबंधच नाही. या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. अगदी सीबीआय चौकशी व्हावी. कॅाल रेकॅार्डींग तपासले जावे. श्री. कांदे यांच्याशी संबंधीत टोल नाक्यावर कार्यकर्त्यांना मारहान करण्यात आली. त्यातील हा प्रकार आहे.माझी बदनामी करणाऱ्या आमदार कांदे यांचीच मी तक्रार देणार आहे.

आज अक्षय निकाळजे यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यांनी आरोपांचे खंडन केले आहे. या सर्व तपासाच्या बाबी आहेत. आताच सर्व माहिती देता येणार नाही. गरज पडल्यास आम्ही त्यांना परत बोलावू. आमदार सुहास कांदे यांनी 5 ऑक्टोंबर नंतर जबाब देण्यासाठी येतो म्हणून कळवले आहे. सध्या ते नांदगाव येथे पूर स्थिती असल्याने मदत कार्यात आहेत.

रियाझ शेख, पोलीस निरीक्षक, गंगापूर पोलीस ठाणे

Related Stories

No stories found.