Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांवर दोन्ही काॅग्रेसच्या दबावामुळेच मंदिरे अद्याप बंद

मुख्यमंत्र्यांवर दोन्ही काॅग्रेसच्या दबावामुळेच मंदिरे अद्याप बंद

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील सर्व धर्मियांची मंदिरे पोलिस बंदोबस्त लावून खुली करावी. सरकारने जन भावनांचा विचार करावा. मात्र, दोन्ही काॅग्रेसचा दबाव असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेत नसल्याची टिका केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही. मात्र कायदा सुव्यवस्था बिघडली तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे सूतोवाच त्यांनी दिले.

- Advertisement -

शासकीय विश्रामगृह येथे रविवारी (दि.१८) जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. करोनाकाळात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे कोरोना वाढला. करोनामध्ये महाराष्ट्र नंबरवर आहे अशी टिका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांच सरकार तीन पायांचे आहे. त्यामुळे कामाचा वेग कमी आहे. उध्दव ठाकरे यांनी आमच्यासोबत आले तर वेग वाढेल, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सेनेला चुचकरण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्‍यांना तातडीने मदत दिली पाहिजे. पैसे नसेल तर कर्ज काडून शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी त्यांनी केली. नुकसान झालेल्या संपूर्ण पिकाचे नुकसानभरपाई द्यावी. सरकारचा सातबारा कोरा होण्याची वेळ आली तरी शेतकऱ्यांचा सातबारा अद्याप कोरा करण्यात आलेला नाही असा निशाणा त्यांनी महाविकासआघाडीवर साधला. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे हीच आमची ही मागणी आहे. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

बाॅलीवूड मुंबईतच राहायला हवे

ड्रग घेणाऱ्या लोकांना काम दिले तर आरपीआय शुटिंग बंद पाडेल.

अनुराग कश्यप यांना अध्याप अटक नाही. अशा केस मध्ये वेळकाढूपणा नको. फिल्म मध्ये काम मिळवण्यासाठी महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी. फिल्म इंडस्ट्री मुंबई मधेच रहावी असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या