आरपीएफ जवानाचे प्रसंगावधान; प्रवाशाला जीवदान

आरपीएफ जवानाचे प्रसंगावधान; प्रवाशाला जीवदान

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येथील रेल्वे स्टेशनवर गाडी सुरू झाल्यावर पवन एक्सप्रेसमध्ये ( Pawan Express)चढताना एका प्रवाशाचा तोल गेल्याने तो गाडी खाली जाण्याच्या आत आरपीएफ जवानाने त्याला खेचून बाहेर ओढले व त्याचा जीव वाचवला. याबद्दल जवान के.के. यादव ( K K Yadav )यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सदरील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पवन एक्सप्रेस उभी असताना राम मोहरी प्रजापती (18) हा युवक प्लॅटफॉर्म दोनवर गाडीमध्ये चढत होता. रेल्वेमध्ये सामान टाकताना गाडी सुरू झाली आणि चढण्याच्या घाईगडबडीत त्याचा तोल गेला.

येथे तैनात आरपीएफ जवान यादव यांनी ही घटना पाहताच त्याला गाडीपासून दूर ओढले व त्याचा जीव वाचवला. या घटनेत हा प्रवासी प्लॅटफॉर्मवर 50 फूट फरपटत गेला. यादव यांचे पोलीस निरीक्षक हरपलसिंग यादव आणि जे.पी. राजपूत यांनी अभिनंदन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com