रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला नमवले

jalgaon-digital
1 Min Read

दुबई । वृत्तसंस्था

राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात बंगळुरूने ७ गडी राखून विजय मिळवला

नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना बेन स्टोक्ससोबत सलामीला रॉबिन उथप्पा यांनी खेळ चांगला यशस्वी ठरवला. उथप्पाने ७ चौकारांसह एका षटकाराच्या मदतीने एकूण २२ चेंडूत ४१ धावा केल्या, तर बेन स्टोक्स १५ धावांवर बाद झाला.

स्टीव्ह स्मिथने चांगली खेळी केली स्मिथने अर्धशतक केले. शेवटच्या षटकांत राहुल तेवातियाने ११ चेंडूत १९ धावा करत संघाला १७७ पर्यंत नेले. बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने २० षटकात १७७ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानने बंगळुरूला १७८ धावांचे लक्ष्य दिले. .

१७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या फलंदाजांना अपेक्षित गती मिळाली नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना १८व्या षटकापर्यंत बंगळुरूचा संघ खूपच मागे राहिला होता, पण डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीच्या बळावर शेवटच्या दोन षटकांत ३५ धावा करत बंगळुरूने धमाकेदार विजय मिळवला. बंगळुरूचा हा स्पर्धेतील सहावा विजय ठरला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *