रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात मोठी घडामोड; शिंदेंवरच गुन्हा दाखल

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात मोठी घडामोड; शिंदेंवरच गुन्हा दाखल

ठाणे | Thane

ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना काही महिलांकडून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावरुन ठाण्यातील राजकारण चांगलंच तापले आहे.

दरम्यान ठाकरे (Thackeray) कुटुंबाने रुग्णालयात जावून रोशनी शिंदे यांची विचारपूस केली आहे, मात्र या प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे.

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात मोठी घडामोड; शिंदेंवरच गुन्हा दाखल
IPLवर कोरोनाचे सावट; 'या' दिग्गजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह

रोशनी शिंदे यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टवरुन रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे. यामुळे पोलिसांनी रोशनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात येत आहे. कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला गेला आहे.

मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यावरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com