जिल्हा शल्यचिकित्सकांंकडून शस्त्रक्रियागृहाची छत दुरूस्ती

जिल्हा शल्यचिकित्सकांंकडून शस्त्रक्रियागृहाची छत दुरूस्ती

नाशिक। प्रतिनिधी Nashik

लासलगाव Lasalgaon येथील रुग्णालयात असलेले शस्त्रक्रिया गृहाचे छत गळत असल्याने leakages of operation theater roof ते अनेक दिवसांपासून बंद होते. होते. येथे स्वतः जिल्हा शल्यचिकीत्सकांनी दौर्‍या दरम्यान छत दुरूस्तीचे काम करून गळती बंद केली. त्यामुळे येथील आरोग्य अधिकारीख, कर्मचार्‍यांना चपराक बसली.

संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या नाकर्तेपणामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात District Surgeon Dr. Ashok Thorat ग्रामीण भागात दौर्‍यावर असताना हा प्रकार लक्षात येताच तातडीने स्वतः दुरुस्ती करून शस्त्रक्रिया गृह सुरू केले.

ग्रामीण भागात नागरिकांना महत्वाचा दवाखाना म्हणजे शासकीय रुग्णालय असते. या रुग्णालयात जर काही अडचण झाली तर ग्रामस्थांना तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. तर या रुग्णालयाच्या अडचणी सोडवण्यासाठी लगेचच उपाययोजना राबवावा लागतात. लासलगाव येथे असेच किरकोळ कारणाने अनेक दिवसांपासून लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे शस्त्रक्रिया गृह पावसाचे पाणी गळतीमुळे बंद होते.

स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक यांनी छतावर चडून पाहिले तर शस्त्रक्रिया गृहाचे छतावर सोलार पॅनल पडलेले व गवत उगवलेले दिसले. पॅनल बाजुला करुन गवत काढले तर गळती बंद होण्यासारखी परिस्थिती असताना किरकोळ कारणांमुळे बंद असलेले शस्त्रक्रिया गृह तात्काळ सुरु करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्वतः ही उपाययोजना केल्याने कोणावर अवलंबून न राहता जनतेची सेवा करण्याचा धडा संबंधितांना शिकवल्याची परिसरात चर्चा होती.

Related Stories

No stories found.