नाशिकच्या सुपुत्राचा अमेरिकेत डंका; दोन तास आधीच पूर्ण केली खडतर 'आयर्नमॅन स्पर्धा'

नाशिकच्या सुपुत्राचा अमेरिकेत डंका; दोन तास आधीच पूर्ण केली खडतर 'आयर्नमॅन स्पर्धा'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकचे सुपुत्र रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आयर्नमॅन स्पर्धा (Ironman Competition) यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. रोहित पवार यांनी रविवार दि. १२ रोजी देस मोइंस, अमेरिका (America) येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेऊन ती स्पर्धा 14 तासांच्या अथक प्रयत्नांनी जिंकली आहे...

अतिशय खडतर असलेल्या या स्पर्धेत त्यांनी चार किमी स्विमिंग (Swimming) १ तास २५ मिनिटात, १८० किमी सायकलिंग (Cycling) ६ तास ५२ मिनिटात व 42 किमी रनिंग (Running) ५ तास ५० मिनिटात पूर्ण करून नियोजित वेळेच्या 2 तास 28 मिनिट आधीच ही स्पर्धा जिंकली.

नाशिक येथील डॉ. सुभाष पवार (Dr. Subhash Pawar) यांचे ते सुपुत्र आहेत. डॉ. सुभाष पवार यांनी गेल्या वर्षीच मेक्सिको (Mexico) येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत वयाच्या 66 व्या भाग घेवुन ती स्पर्धा निर्धारित वेळेच्या 2 तास आधीच जिंकून भारतातले सर्वात वयोवृद्ध व जलद आयर्नमॅन ठरले होते.

रोहित पवार यांच्याबद्दल

रोहित पवार यांचा जन्म 18 जून 1986 रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नाशिक येथील सेंट फ्रान्सिस या इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुणे येथील सिंहगड कॉलेजमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. ते अमेरिकेत फ्लोरिडा येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सध्या नोकरी करतात. गेल्या 4 वर्षांपासून त्यांनी व्यायामावर लक्ष केंद्रित करून खडतर अशी आयर्नमॅन स्पर्धा जिंकली आणि नाशिकचे नाव अमेरिकेत उज्ज्वल केले आहे.

आतापर्यंत यांनी जिंकली स्पर्धा

 • अमार मियाजी

 • आयपीएस डॉ. रवींद्र सिंगल

 • रविजा सिंगल

 • चेतन अग्निहोत्री

 • महेंद्र छोरीया

 • डॉ. अरुण गचाले

 • प्रशांत डबरी

 • किशोर घुमरे

 • डॉ. वैभव पाटील

 • डॉ. देविका पाटील

 • अरुण पालवे

 • निलेश झंवर

 • अनिकेत झंवर

 • डॉ. सुभाष पवार

 • रोहित पवार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com