ओबीसी आरक्षणात खडसेंच्या कन्येची उडी, फडणवीसांना केला हा सवाल?

रोहिणी खडसे
रोहिणी खडसे

मुंबई :

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पाच जिल्ह्यातील पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर आता राजकारण पेटले आहे. समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी या निवडणुकांना विरोध केल्यानंतर आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी लक्ष केले आहे. ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना केला आहे.

रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट हल्ला केला. त्यांनी ट्विट करत फडणवीसांना सवाल केला. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस

पावसाळी अधिवेशनाचा कालावधी, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, ओबीसी आरक्षण आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com