Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : रॉजर फेडररला निरोप देताना चाहत्यांना अश्रू अनावर

Video : रॉजर फेडररला निरोप देताना चाहत्यांना अश्रू अनावर

नवी दिल्ली | New Delhi

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू (Tennis) रॉजर फेडररने (Roger Federer) काही दिवसांपूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.२३) रोजी तो त्याच्या करिअरमधली अखेरचा सामना खेळला. यावेळी चाहत्यांनीच नाही, तर त्याचा जोडीदार राफेल नदाल यानेही फेडररला भरल्या डोळ्यांनी भावनिक निरोप दिला…

- Advertisement -

२० ग्रँडस्लॅम विजेतेपद नावावर असलेला चॅम्पियन रॉजर फेडर या सामन्यात स्पेनचा प्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदालसह (Rafael Nadal) डबल्स खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. लंडनमध्ये झालेल्या या सामन्यात फ्रान्सिस टियाफो (Francis Tiafoe) आणि जॅक सॉक (Jack Sock) या अमेरिकन जोडीने नदाल आणि फेडरर जोडीचा ४-६,७-६,११-९ असा पराभव केला.

या पराभवासह फेडररची प्रोफेशनल टेनिस कारकीर्द संपुष्टात आली. तर या सामन्यानंतर फेडररला अश्रू अनावर झाले. त्यावेळी त्याचा पार्टनर नदालही रडतांना दिसला. यावेळी सामना पाहण्यासाठी आलेल्या नोव्हाक जोकोविचलाही (Novak Djokovic) आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यानंतर फेडररने तिथे उपस्थित असणाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आणि टेनिस खेळाला निरोप दिला.

तसेच पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत रॉजर फेडरर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. तर सर्वाधिक २२ ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकून राफेल नदाल या यादीत अव्वल स्थानावर आहे.

दरम्यान, २८ जानेवारी २०१८ रोजी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) फेडररने आपले शेवटचे ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकले. त्यानंतर त्याने क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा पराभव केला. त्यावेळी २० ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. मात्र, या वर्षाच्या शेवटी राफेल नदालने त्याचा विक्रम मोडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या